प्रस्तावना
कुणबी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी विविध लोकप्रतिनिधी, विविध संघटना यांचेकडून केली जाणारी मागणी विचारात घेवून शासनाने कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजाच्या सर्वांगिण विकास व आर्थिक उन्नतीसाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून “शामराव पेजे कोकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळाची” दि.25.08.2009 रोजीच्या शासन निर्णयान्वये स्थापना केली आहे. कोकण विभागातील मागास असलेल्या कुणबी व इतर मागासवर्गीय समाजातील युवकांना महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा (बीज भांडवल योजना, थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना) लाभ देण्यात येतो.